Subscribe
Add to Technorati Favourites
Add to del.icio.us

ही कवीता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल
रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल

पाच जनांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तू सापडेल
नाही केली तर, भूत तुम्हाला कानाखाली झापडेल

दहा जनांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल
नाही केली तर, पाठीवर चोप बेसुमार मिळेल

पंचवीस जनांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट वर चढेल
नाही केली तर, कावळ्याचे शिट डोक्यावर पडेल

पनास जनांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल
नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लुज मोशन होईल

शंभर जनांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल
नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

0 comments:

Post a Comment