Subscribe
Add to Technorati Favourites
Add to del.icio.us
Saturday, July 18, 2009

Marathi Comedy

Posted by Shweta

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

Friday, July 17, 2009

प्रेम........

Posted by Shweta

प्रेम,
अव्यक्त भावना
जगण्याची प्रेरणा
प्रत्येकाच खुळ
दुखाच मुळ,

प्रेम,
दोन जिवांचा मेंळ
प्रीतिचा खेळ
रंगांची उधळन
सप्तसुरांचे मिलन,

प्रेम,
जपलेली नाती
शिंपल्यातला मोती
कोकीळएचा स्वर
पावसाची सर,

प्रेम,
मिरेची भक्ति
राधाकृष्णाची प्रीती
स्वप्नाची दुनिया
देवाची किमया

प्रेम,
शब्दांची सरिता
श्वेताची कविता

अश्रु

Posted by Shweta

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............ ......... ..

Tuesday, June 9, 2009

भेटशील का गं तू....???

Posted by Shweta


भेटशील का गं तू....?

____________________________________________________________________

वाट पाहतोय तुझी, येशील का गं तू....?
सुन्या माझ्या जीवनात रंग भरशील का गं तू....?

जानतोय मी, येणं शक्य नाही,
येण्याचा प्रयत्न करशील का गं तू....?
तोडून सा~या बंधनाना माझी होशील का गं तू....?

मी मेल्यावर माझ्यासाठी रडशील का गं तू....?
रडली नाहीस तरी चालेल,
पण एकांतात माझी आठवण काढशील का गं तू....?

मी मेल्यावर माझी प्रेमपत्रे पुन्हा पुन्हा वाचशील का गं तू....?
मी मेल्यावर का होईना पण मनातल्या भावना ओठांवर आणशिल का गं तू....?

आपण नेहमी भेटायचो तिथे जाउन
माझा सहवास अनुभवशील का गं तू....?
मी असेलच तिथे
पण नसलोच तर मला बोलावशील का गं तू....?

नेहमीप्रमाणे पहिल्या पावसाचे थेंब अंगावर घेशील का गं तू....?
अन् त्या थेम्बान्मद्धे मी असेल म्हणुन लाजशिल का गं तू....?

पुढच्या जन्मात माझी होशील का गं तू....?
अन् तुटत्या ता~याकडे बघून मला मागशील का गं तू....?

ह्या सा~या प्रश्नांचे उत्तर देशील का गं तू....?
उत्तर दिले नाही तरी चालेल तुझ्या डोळ्यांतुन मला कलेल
पण त्यासाठी तरी एकदा मला भेटशील का गं तू....?


कावळा आणि चिमणी

कावळा आणि चिमणी
राहायचे शेजारी
सुख होतं भरपूर
दोघांच्याही घरी

कावळ्याचं घर होतं शेणाचं
चिमणीचं घर होतं मेणाचं

एकदा काय झालं
खूप पाऊस आला
पुराच्या पाण्याने
गाव भरून गेला

कावळ्याचं घर गेलं वाहून
चिमणीकडे आला तो धावून


"चिमणे चिमणे दार उघड"
कावळा म्हणाला चिमणीला
"पिलू आहे छोटं, वेळ नाही मला"
चिमणी म्हणाली कावळ्याला

कावळा बिचारा गेला निघून
पावसाच्या पाण्यात राहिला भिजून

चिमणी मात्र होती
तिच्या पिलात व्यस्तं
पिलासवे तिचा
दिवस जाई मस्तं

दिवसां मागे दिवस गेले
चिमणीचे पिलू मोठे झाले

पिलाला उडायची
हौस होती भारी
उंच आकाशात
त्याने मारली भरारी

मोकळ्या आकाशी गेले ते उडून
चिमणीच्या घरट्यात, नाही आले परतून

चिमणीला पिलाची
यायची आठवण
पिलू मात्र करी
पैशांची पाठवण

चिमणी झाली होती खूप म्हातारी
म्हातारपणाने पडली आजारी

"आजारी आहे चिमणी"
असा पिलाला निरोप गेला
पण ऐन वेळी मदतीला
कावळाच धावून आला

पिलू होते दूर
त्याने केला फोन
औषधांसाठी म्हणे
पाठवतो पैसे दोन

चिमणी म्हणे पिलाला, पैसे नको...
माझी थोडीही काळजी करू नको

कावळ्याने चिमणीची केली सेवा
खायला तिच्यासाठी आणला मेवा

कावळ्याच्या मदतीने
चिमणी झाली बरी
त्याची तिने मागितली
माफी खरी खरी

कावळा म्हणाला विचार नको करू फार
घरासोबत जोडावे मित्रही चार!

कावळा अन् चिमणी आता
झाले मित्र पक्के
एकमेकांच्या मदतीने
काढले आयुष्य अख्खे!

Posted by Shweta

रिमझीम पावसात मी एकटा उभा होतो
ती गेली त्या वाटेकडे नजर लाऊन होतो
ये परत येइल माझे मन सांगत होते
पाऊसाच्या पाण्यात माझे अश्रु मिसळत होते



कसे सांगू की आज
मन वेड्यागत का होते?
जे म्हणावे आपलं
ते परकं का होते?

करी तू सहज इशारा
असा जाता जाता
ही तूझीच अदा,
मन माझे फ़िदा का होते ?

पहावे तूला एकटक
वाटे क्षण क्षण पहात राहावे
न दिसता तू क्वचीत,
मन बावरे का होते?

रंग सारे निसर्गाने
रूपात तूझ्या सजवीले होते
गंध, फ़ूले नी फ़ूलपाखरे
सांग तूझवरी रूसली का होते ?

सजले दिवे तारंकांचे
उमळोन चंद्र ही आला
आसमंती मैफ़िलीत त्या
सूर तूलाच शोधत का होते ?

चालतांना मी एकटाच
धूंद धूक्यातली वाट
मला नित्य वेढणारे
तूझेच भास का होते?

न शक्य अताशा
तूझवाचून जगणे माझे
अता डोळ्यात माझ्या
मिलनाचे स्वप्न का होते?


----

'ती' आणि 'मी'

Posted by Shweta

'ती' आणि 'मी'

कॉलेज चा पहिला दिवस...
वर्ग नवीन, मुले नवीन, कट्टा पण नवीनच...
एण्ट्रीलाच 'त्या' ग्रूप ने अडवले.
Raggingच्या नावाखाली झाडं मोजायला लावली...
त्यात, झुडपे आणि रोपटी...
मी नवीन, गोंधळलेला, जरासा घाबरलो.. रडकुंडिला आलो..
त्या ग्रुपमधली 'ती' तेव्हा मदतीला आली..
कानात काहीतरी सांगून पसार झाली..
'मी' मग शेर झालो, 'अकरा हजार पाचशे पंचावन्न' आकडा सांगून निघून गेलो...
'ती' ला शोधता शोधता दोन दिवस गेले आणि परत तिचे दर्शन कट्ट्यावरच झाले...
'ती' हसली, एकटी होती म्हणून 'मी' पण हसलो...
भीड गेली आणि मग आमची दोस्ती झाली.
'ती' Senior असूनही मग आमच्या सुरू झाल्या भेटीगाठी....
पाउस, थंडी उन्हाळा करत, एक वर्ष सरले..
प्रितीला आमच्या तेव्हा मग उधाण आले...
-------------
सरता सरता 'ति'चा कॉलेज चा शेवटचा दिवस आला..
तो गोड करण्यासाठी रडत रडतच आईसक्रीमचा कोन दोघांनी मिळून खाल्ला..
आपली प्रित वाढवायच्या आणाभाका खाउन आम्ही वेगळे झालो..
रोज फोन वर बोलत राहिलो, अधून मधून भेटत राहिलो..
शेवटी 'ति'चे फोन बंद झाले आणि एक दिवस 'ति'च्या लग्नाचे आमंत्रण मिळाले..
खूप वाईट वाटले.. लहान केल्याच्या जाणिवेने तेव्हा देवाला दोष दिले..
दहा दिवसांनी माझा वाढदिवस होता आणि तोच दिवस निमंत्रण-पत्रिकेवरही होता..
'ति'च्या लग्नाला मुद्दाम गेलो.. 'ति'च्या डोळ्यात उगाचच स्वत:ला शोधत बसलो..
'ति'च्या डोळ्यातले भाव पाहून तसाच मग 'मी' माघारी फिरलो...
रूमवर आल्यावर एक बंद पाकीट माझी वाट पाहत होते...
त्यालाही न उघडता तसेच बॅगच्या तळाशी ठेवले...

-----
पाच वर्ष झाली ते पाकीट असेच बंद होते....
पण मनात कुठेतरी कुतूहल होते..
पाच वर्ष जपून ठेवलेले ते पाकीट त्या सकाळी उघडले आणि....
आणि काळीज चरररर झाले...
ते ... ते पाकीट म्हणजे 'ति'चे पत्र होते...
त्यात 'ति'ने माझ्या अबोल प्रश्नांची उत्तरे दिली होती..
वडिलांच्या आग्रहामुळे 'ती' आज माझी नव्हती ...
तरीही 'ति'चे मन माझ्यात गुंतलेले, माझ्यासाठी झुरत होते...
------
'मी' माझ्या प्रपंचात आणि कदाचित 'ती' तिच्या प्रपंचात सुखी असु...
पण कधीतरी अजूनही जुन्या आठवणी जागत असु...
आता तसा आमचा एकमेकांशी काही संबंध नाही उरलाय ..
तरीही कट्ट्याशी असलेला लळा नाही तूटलाय...
आजही 'मी' वाढदिवसाला त्या कट्ट्यवर जातो...
'ति'च्या येण्याची, एक नजर दिसण्याची आस धरून परत झाडं मोजत राहतो...


पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.


या सुंदर जीवनात कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच

विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर "जागली होतिस का रात्री?"

म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही

पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच

"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी

विरहात तीच्या ...

असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..

असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी ......................



कीतीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फ़िरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हिम्मत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुश्ठीनी कधी बघीतलेच नाही या व्यतिरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाला कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बय्राच सुंदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

Wednesday, June 3, 2009

एक प्रेयसी पाहिजे

Posted by Shweta

एक प्रेयसी पाहिजे,........ मिळेल का अशी???????
एक प्रेयसी पाहिजे............
एक प्रेयसी पाहिजे............

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन् मलाही तिच्यासोबत भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरणमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधलत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बहुपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसनरी;
पण मानाने मात्र, अप्रतिम सुंदर दिसणारी,

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नात्याला हळुवारपणे जपणारी,

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जनणारी;
मे जसा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणारी,

एक प्रेयसी पाहिजे, प्रेमाला प्रेम समझणारी;
सुखा- दु:खात माझ्या तन्मयतेने साथ देणारी,

एक प्रेयसी पाहिजे,........ मिळेल का अशी???????

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं
भरलेच डोळे कधी तर ओलं आसवानां पुसणारं !

कुणीतरी असावे
पैलतिरी साद घालणारं
शब्दानां कानात साठवुन गोड प्रतिसाद देनारं !

कुणीतरी असावे
चांदण्याच्या बरोबरो नेणारं
आंधारलेल्या वाटेत आपल्या सोबत येणारं !

कुणीतरी असावे
फुलासारखं फुलणारं
फुलता फुलता सुगंध दरवळणारं !

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं
पलिकडील किनार्‍यारुन आपली वाट पाहणारं !

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं

कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ

हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा

अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला

एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी

अस्मानीची असावी जशी एक परी...

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी

दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात .

मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो

जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं

आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं

नाही आलं तर ते आपलं नव्हतंच
आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय

क्षितीजापलीकडे पाहण्याची दृष्टी असेल

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा.

मी कुठवर पाहू वाट ?
सांग ना.....
कुठवर पाहू वाट ?

या उत्तररात्री आठवतो मज
केशसंभार घनदाट
ही रिती शेज अन् तळमळता मी
जाते उशीत भिजून पहाट
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

तो तरुण कोवळा स्वप्नाळू
ती सुंदर , शीतल ना कुठला थाट
पाहताच तिला तो हरवून गेला
....नयनी आठवांची* ही लाट ! * आठवांची = आठवणींची
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

ते भावविश्व नाजुक त्याचे
ती परखड , वास्तव , अभ्यासू
पुसताच तिला त्याने तेंव्हा
मारली तिनेच त्यावर काट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

आला इथवर तो, संसारी
पण विसर न पडला खास
नांदीस जिंदगीच्या तेंव्हा
लागला भैरवीचा जो नाट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

हे घरकुल सारे भरलेले
पण साक्षीस ना भार्या आता
मज नसे वासना कशाचीच
पण्.....समोर भरले ताट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

केली न कधीही प्रतारणा
पण कांता न च झाली प्रेयसी
जरी प्रेयसी न झाली कांता,
मनीचा सरला न अंतर्पाट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वा

Posted by Shweta

बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.'' सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.'' नव-याने प्रेयसीला फोन केला, ''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.'' प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ''मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.'' विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ''आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.'' आजोबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ''हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.'' सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ''बाहेरगावी जाणे रद्द.'' नव-याने प्रेयसीला फोन केला, ''आपली भेट रद्द.'' प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ''माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.'' विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ''ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.'' आजोबांनी पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ''माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता..

मी कशी आहे

Posted by Shweta

मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही....................
कधी मी वारयाची झुलूक असते
तर कधी बेफाम वारा असते

कधी
मी पावसाची हलकी सर असते
तर कधी समुद्रची लाट असते

कधी मी डोलनारे कणिस असते
तर कधी खम्बिर तरु असते

कधी मी शांत नदी असते
तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते

मी तो सुर आहे

जो मनाला दिलासा देतो,
तर कधी हुरहुर लावतो

बस आणि काय सांगू
सगलच लिहिता येत नाही
म्हनून म्हणते
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही..

ओर्कुट वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रप मधेय (प्रेमाने)शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...

ओनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...

मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy'म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण जो 'Whts Real,Virtual ?..Friends Are Forever'असे म्हणतो,
तो मुलगा मराठी असतो...

Sunday, May 31, 2009

नाते प्रेमाचे

Posted by Shweta

या जगात नाही दुसरे
प्रेमाहुन निर्मळ नाते...
पण हेच नाते क्षणात आपुले
जिवन विस्कटून जाते
या नात्याला व्याख्या नाही
थोर सांगून गेले बरे
मात्र ते फार सुंदर असते!
हे विधान आहे खरे.
केव्हातरी मी हि केले होते,
जिवापाड प्रेम एकीवर.......
पण, माझ्या प्रेमाला तिचा
नकार आहे आजवर.
मला दु:ख नाही तिच्या
नकारार्थी उत्तराचे..
दु:ख वाटते ते तिच्या
प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि
निव्वळ टाईमपास या शब्दांचे....
तिला नाही कळला,
माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...
तिच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,
ते सारे गेले व्यर्थ.
मी तिच्यावर आजही
मनापासून प्रेम करतो,
मनातले प्रेमभाव,
कवितेच्या रुपात वाहतो.
कळेल तिला माझ्या
एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!
फार वेळ झाली असेल...
कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!

तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत.... 

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तु सुद्धा माझ्याकडे बघतेस
डोळ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना
हसून का उत्तर देतेस


आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा...... 

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी

आवडत्या प्राणी/पक्ष्यावरचा निबंध हा नावडत्या प्राणी/पक्ष्यावर अन्याय आहे आसे मनेका गांधी ला वाटते.

मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात.
कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे.

कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात.

कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो.

कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो. याच तापाला "बर्ड फ्यु" का असेच काहीतरी नाव इंग्रजी नाव आहे. मला गणित व इंग्रजी येत नसल्याने मला शाळेत खुप ताप होतो.

कोंबडीला दगड मारल्यावर ती पकाक असा आवाज काढते. मला तो खूप आवडतो. नाना पाटेकरचा पक पक पकाक असा सिनेमा आहे. भरत जाधवचा पण जत्रा नावाचा कोंबडीवर सिनेमा आहे. तो मात्र अतिशय वाईट होता. सिनेमा बघणे वाईट असते असे मोठी माणसे सांगतात पण मला सिनेमा पाहणे आवडते. 

!!!...एक प्रेम कथा....!!!

एक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.
एक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.
परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते.....
नेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता, का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ....
महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले.

महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते....तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते.
तिला वाईट वाटत. आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की, त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते. याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते.

तिच्या रडण्याचे कारण की, त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती.
ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती.........

ही कविता प्रेमात तुटुन पुन्हा उभे राहणार्‍या कोणासाठी तरी आहे...

मला सोडण्यासाठी मी आभारी आहे तुझा......

ओला फ़ाटा असुनहि तेव्हा
मी तुझ्याबरोबर थोडा जळालो होतो
पण जरी आता मी काहीच नाही
तरी एक निखारा होउन उरलोय
स्वतःच्या आतल्या धगधगीला विसरलो होतो
तुझी नाही त्या वार्‍याची साथ मी घेतोय
त्वेषाने या जीवनाच्या निरंतर अग्निकुंडात स्वतःला उभारतोय

कदाचित तुझ्याबरोबर असतानाच
तुझ्याकडुनच माझी खरी किंमत कळली होती
तुझ्यानंतर मला जीवन वाटायचा कुटणारा खलबत्ता
मला दोन तुकड्यात मोडणारा क्रुर अडकित्ता
पण आता जाणलोय तो तर असतो एक हुकमी पत्ता
फक्त कसा वापरायचा ते मात्र शिकलो नव्हतो
आता जीवनाच्या अमानुष जुगारात मी हर बाज़ी जिंकतोय

वाटले लंगडा जीवनाचा रथ तुझ्यामुळे
वार्‍याच्या वेगाने धावू लागेल
पण तुझ्या जाण्यानं दाखवुन दिलंस
कदाचित तुलाही त्यासह ओढावं लागलं असतं
आधीच लंगडा तुझ्या ओझ्याने जागीच रुतलो असतो
थोडे दिवस नक्कीच मी रस्ता भटकलो होतो
पण आता ज़ीवनवाटेवर दुःखानेच दंडात दम भरुन धावतोय

आभारी आहे मी तुझा या सगळ्यासाठी
तुझी ना-लायकी वेळेवर दाखवुन दिल्यासाठी
उशीराच का होइना पण मी तुझे आभार मानतोय
तुझ्याबरोबर असताना समाजाच्या चालीरीती मोडत होतो
कळलेय आता केवढ्याश्यासाठी केवढं बाजुला सारत होतो
काही काळच नात्यांच्या धाग्यांचे उपकार विसरलो होतो
पण आता पुन्हा त्याच धाग्यांनी जीवनाची लोकर मी विणतोय
थोड्या धीरानेच आता त्याच्या उबेमध्ये मी विसावतोय....................

ही कवीता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल
रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल

पाच जनांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तू सापडेल
नाही केली तर, भूत तुम्हाला कानाखाली झापडेल

दहा जनांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल
नाही केली तर, पाठीवर चोप बेसुमार मिळेल

पंचवीस जनांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट वर चढेल
नाही केली तर, कावळ्याचे शिट डोक्यावर पडेल

पनास जनांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल
नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लुज मोशन होईल

शंभर जनांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल
नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

प्रेमात गणित नसते...

पण प्रेमात आणि आयुष्यात एक गोष्ट सत्य असते ...
कुठले गणित बरोबर येइल हे आपण सांगू शकत नहीं...
आणि कुठले चुकेल हे पण सांगू शकत नहीं...
आपल्या हातात फक्त गणित मांडणे असते..

इथे सगळेच व्यवहार उलटे असतात..

जी व्यक्ति आपली समजुन जिव लावतो..ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नहीं..
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते...ती आपल्यावर जिव टाकत असते..

गोष्ट प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याचिच असते अस नहीं..
हा प्रकार सगळ्या नात्यांमधे थोड्याफार फरकाने दिसून येतो..

एकदा वर्गात गणिताचा विषय चालु होता..

गुरुजी: गोट्या, समज तुझ्याकडे १० लाडु आहेत.
गोट्या: माझ्याकडे १० लाडु नाही आहेत.
गुरुजी: अरे समज की, तुझ्या बापाचं काय जातं??
गोट्या: खरं माझ्याकडे १० लाडु नाही आहेत.
गुरुजि: बरं, तु बस..... अरे बंड्या, समझ तुझ्याकडे १० लाडु आहेत.
बंड्या: माझ्याकडे १० लाडु नाही आहेत.
गुरुजी: अरे मुर्खा, समज की, तुझ्या बापाच काय जातं??
बंड्या: बरं ...ठिक आहे..पुढे सांगा.
गुरुजी: तुझ्याकडे १० लाडु आहेत आणि मी तुला आणखी ५ लाडु दिले..किती लाडु झाले????
बंड्या: २०!!
गुरुजी: काय रे गाढवा, ५ आणि १० वीस(२०) होतात ???
बंड्या: समजा की हो गुरुजी, तुमच्या बापाचं काय जात