Subscribe
Add to Technorati Favourites
Add to del.icio.us

कीतीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फ़िरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हिम्मत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुश्ठीनी कधी बघीतलेच नाही या व्यतिरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाला कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बय्राच सुंदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

0 comments:

Post a Comment