Subscribe
Add to Technorati Favourites
Add to del.icio.us
Wednesday, June 3, 2009

मी कुठवर पाहू वाट ?

Posted by Shweta

मी कुठवर पाहू वाट ?
सांग ना.....
कुठवर पाहू वाट ?

या उत्तररात्री आठवतो मज
केशसंभार घनदाट
ही रिती शेज अन् तळमळता मी
जाते उशीत भिजून पहाट
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

तो तरुण कोवळा स्वप्नाळू
ती सुंदर , शीतल ना कुठला थाट
पाहताच तिला तो हरवून गेला
....नयनी आठवांची* ही लाट ! * आठवांची = आठवणींची
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

ते भावविश्व नाजुक त्याचे
ती परखड , वास्तव , अभ्यासू
पुसताच तिला त्याने तेंव्हा
मारली तिनेच त्यावर काट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

आला इथवर तो, संसारी
पण विसर न पडला खास
नांदीस जिंदगीच्या तेंव्हा
लागला भैरवीचा जो नाट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

हे घरकुल सारे भरलेले
पण साक्षीस ना भार्या आता
मज नसे वासना कशाचीच
पण्.....समोर भरले ताट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?

केली न कधीही प्रतारणा
पण कांता न च झाली प्रेयसी
जरी प्रेयसी न झाली कांता,
मनीचा सरला न अंतर्पाट !
सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वा

0 comments:

Post a Comment