Subscribe
Add to Technorati Favourites
Add to del.icio.us
Tuesday, June 9, 2009

भेटशील का गं तू....???

Posted by Shweta


भेटशील का गं तू....?

____________________________________________________________________

वाट पाहतोय तुझी, येशील का गं तू....?
सुन्या माझ्या जीवनात रंग भरशील का गं तू....?

जानतोय मी, येणं शक्य नाही,
येण्याचा प्रयत्न करशील का गं तू....?
तोडून सा~या बंधनाना माझी होशील का गं तू....?

मी मेल्यावर माझ्यासाठी रडशील का गं तू....?
रडली नाहीस तरी चालेल,
पण एकांतात माझी आठवण काढशील का गं तू....?

मी मेल्यावर माझी प्रेमपत्रे पुन्हा पुन्हा वाचशील का गं तू....?
मी मेल्यावर का होईना पण मनातल्या भावना ओठांवर आणशिल का गं तू....?

आपण नेहमी भेटायचो तिथे जाउन
माझा सहवास अनुभवशील का गं तू....?
मी असेलच तिथे
पण नसलोच तर मला बोलावशील का गं तू....?

नेहमीप्रमाणे पहिल्या पावसाचे थेंब अंगावर घेशील का गं तू....?
अन् त्या थेम्बान्मद्धे मी असेल म्हणुन लाजशिल का गं तू....?

पुढच्या जन्मात माझी होशील का गं तू....?
अन् तुटत्या ता~याकडे बघून मला मागशील का गं तू....?

ह्या सा~या प्रश्नांचे उत्तर देशील का गं तू....?
उत्तर दिले नाही तरी चालेल तुझ्या डोळ्यांतुन मला कलेल
पण त्यासाठी तरी एकदा मला भेटशील का गं तू....?


0 comments:

Post a Comment